एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

 


मुंबई : महाराष्ट्रातील महायुतीचा घटक असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे) विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली, त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. मुंबईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्याचा ठराव सर्व 57 नवनिर्वाचित आमदारांनी एकमताने मंजूर केला. पक्षाला प्रचंड विजय मिळवून दिल्याबद्दल शिंदे यांचे कौतुक, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानणारे आणखी तीन ठरावही मंजूर करण्यात आले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत