विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर
नमुंमपा कार्यक्षेत्रातील आर्थिक दुर्बल, विधवा / निराधार, स्थानिक प्रकल्पग्रस्त, सफाई कामगार, नाका कामगार व मागासवर्गीय घटकांतील इ.1ली ते महाविदयालयीन शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करणे ही योजना ऑनलाईन पध्दतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता राबविण्यात येत आहे.
उक्त शिष्यवृत्ती योजनांकरिता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 30 नोव्हेंबर 2024 असून या कालावधीपर्यंत विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.schemenmmc.com या संकेत स्थळावर स्विकारण्यात येत आहेत.
तथापि, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गरजू विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेकरिता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 30/11/2024 रोजी पर्यंत असल्याने सदर कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावेत. तद्नंतर प्राप्त अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
तरी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध घटकांकरिता राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांचा महानगरपालिका क्षेत्रातील गरजू लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment