अनुसूचित जमातीच्या उमेदवारांच्या वनरक्षक पदभरतीकरिता शारीरीक क्षमता चाचणी दि.१४ ऑक्टोबर रोजी



     ठाणे(जिमाका):- वनरक्षक भरती प्रक्रिया सन 2023-24 अंतर्गत शासन निर्णय क्र.5 ऑक्टोबर 2024 नुसार वनरक्षक संवर्गातील अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील मानधन तत्वावर नियुक्ती देण्याकरिता ठाणे व पालघर जिल्हा अनुसूचित क्षेत्राकरीता अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी तसेच या उमेदवारांना विभागनिहाय वाटपाबाबतची माहिती वनविभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

     त्यानुसार पात्र उमेदवारांची ४ तासात २५ कि. मी./ १६ कि.मी. चालण्याची शारीरीक क्षमता चाचणी दि.१४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ६.०० वाजेपासून मुख्य प्रवेशद्वार, (मेनगेट) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली (पूर्व), ओंकारेश्वर मंदिरासमोर घेण्यात येणार आहे. याबाबतच्या सविस्तर सूचनांचे अवलोकन करुन निवड यादीतील / प्रतिक्षायादीतील सर्व उमेदवारांनी या शारिरीक क्षमता चाचणीसाठी विहीत केलेल्या वेळेत उपस्थित राहण्याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक निवड समिती ठाणे वनवृत्त चे सदस्य सचिव तथा उप वनसंरक्षक (प्रादेशिक) ठाणे वनविभाग संदीप रेपाळ यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत