पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे दौऱ्याच्या अनुषंगाने जड व अवजड वाहनांना वाहतूक विभागाकडून ठाणे शहरात प्रवेश बंदी
ठाणे(जिमाका):- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी वालावलकर सभा मैदान, बोरीवडे गाव, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे (प.) येथे 33 हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे ऑनलाईन भूमीपूजन व उद्घाटन तसेच “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या महिला लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार सोहळा पार पडणार आहे.
त्यानुषंगाने ठाणे शहरात खारेगांव टोलनाका आणि कशेळी टोलनाका मार्गे ठाणेकडे जाणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांना आज शुक्रवार, दि.4 ऑक्टोबर रात्री 12:01 वाजेपासून ते शनिवार, दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली आहे.
तरी सर्व ट्रान्सपोर्ट / वेअर हाऊस संघटना / वाहनचालक व मालक यांनी या आदेशाची नोंद घ्यावी, असे वाहतूक विभाग, ठाणे शहर यांनी कळविले आहे.
Post a Comment