साईराम मित्र मंडळाच्या वतीने ठाणे ते शिर्डी सायकलयात्रा

 


 ठाणे  : साईबाबांचा जयघोष करत ठाण्यातून शेकडो साईभक्त सायकलवरून शिर्डीकडे रवाना झाले.

ठाण्यातील नामदेवाडी ,पाचपाखाडी येथील साईराम मित्र मंडळाचा वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही ठाणे ते शिर्डी सायकल यात्रा आयोजित केली होती. पाचपाखाडी येथील साईबाबा मंदिराच्या येथून या सायकल यात्रेला सुरुवात झाली यावेळी आमदार संजय केळकर,माजी नगरसेवक नारायण पवार,भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष राजेश मढवी, मंडळाचे संस्थापक दत्ता मोरे,अध्यक्ष विनोद गुप्ता,उपाध्यक्ष विशाल घाडगे, खजिनदार चंदन धनावडे, सुशांत रहाटे, अजय सुखदरे, गणेश बनोटे आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दरवर्षी कोणत्याही प्रकारचा खंड न पडता अविरतपणे हि सायकल यात्रा आयोजित करण्यात येत सायकल यात्रेचे यंदाचे १८ वे वर्ष असून या सायकल यात्रेत २०० सायकलस्वार सहभागी झाले आहेत. सायकल यात्रेची सुरुवात परिसरातून पालखी मिरवणूक काढून करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व साईभक्त सहभागी झाले होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत