मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सुशिक्षित बरोजगार तरुणांना वाहनांचे वाटप

 माजी नगरसेविका रुचिता राजेश मोरे व माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांच्या विशेष प्रयत्न

 



ठाणे  : महाराष्ट्र शासनाच्या  ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ठाणे महापालिका प्रभाग क्र १२ मधील सुशिक्षित बरोजगार तरुण-तरुणींना ई वाहतूक वाहने आणि फिरती विक्री केंद्र वाहनाचे वाटप रविवारी करण्यात आले.  
 
राज्यातील बहुतांश तरुण सुशिक्षित आहेत व शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते तसेच काहीतरी बनण्याची त्यांची स्वप्ने सुद्धा असतात परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरी मिळत नाही त्यामुळे ते बेरोजगार आहेत. तसेच शिक्षण पूर्ण झाल्यावर बहुतांश तरुण स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असतात परंतु घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करता येत नाही या सर्व गोष्टींमुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सुशिक्षित बेरोजगार व उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या तरुणांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करता यावा या उद्देशाने व उद्योजकाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ची सुरुवात केली .या योजनेअंतर्गत बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्पांच्या किमतीच्या 15 टक्के इतके अनुदान दिले जाते.या योजनेचा फायदा प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांना व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका रुचिता राजेश मोरे व माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांच्या विशेष प्रयत्नाने ठाणे महापालिका प्रभाग क्र १२ मधील सुशिक्षित बरोजगार तरुण- तरूणांना आपल्या पायावर उभे राहता यावा या उद्देशाने सात व्यावसायिक वाहने आणि फिरती विक्री केंद्र वाहनाचे वाटप रविवारी माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शाखा प्रमुख संदिप जाखल, जयवंत चव्हाण, मनोज पवार, सचिन थोटम उप विभाग प्रमुख रविंद्र यादव,समीर परब,रविंद्र वरपे,विनोद पाटेकर,संकेश राखाडे,महेश लहाने,धनेश सावंत व जेष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत