राज्यात महिलांवरील वाढणाऱ्या अत्याचारा संदर्भात ठाणे पोलीस सह आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकारी यांना शिवसेना महिला शिष्टमंडळाचं निवेदन
प्रतिनिधी :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने व रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दि. १९ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान महिला पदाधिकाऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यामध्ये भिवंडी व शहापूर निरीक्षकाची जबाबदारी चिपळूणच्या महिला संपर्कप्रमुख वंदना शिंदे, ठा.म.पा. माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला संघटिका वैशाली शिंदे, माजी नगरसेविका कल्याण शितल मंढारे यांच्याकडे दिली होती. त्यावेळी भिवंडी व शहापूर महिलांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन राज्यात होणाऱ्या महिलांवरील वाढणाऱ्या अत्याचारावर आळा घालण्यासाठी भिवंडी पोलीस उपायुक्त तसेच ठाणे पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी कडून निवेदन दिले. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी तयार केलेला शक्ती कायदा महाराष्ट्र राज्यात आमलात आणण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
त्यावेळी ठा. म.पा माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा मोहिते, महिला उप जिल्हा संघटक आकांक्षा राणे, ठाणे शहर संघटक वैशाली शिंदे, शहर संघटक प्रमिला भांगे तसेच इतर महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment