नौपाडा, कोपरी आणि वागळे इस्टेट परिसरातील अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर महापालिकेची धडक कारवाई सुरूच

                                        


ठाणे  - ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार कारवाईची धडक मोहीम सुरू आहे. आज परिमंडळ २ कार्यक्षेत्रातील वागळे, नौपाडा व‌ कोपरी उपप्रभाग समिती क्षेत्रात अतिक्रमण विभागामार्फत उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

या कारवाईत ठाणे रेल्वे स्थानक १५०-मी परिसरातील अनधिकृत फेरीवाले, राममारुती रोड, गोखले रोड येथील पदपथावरील अनधिकृत यांच्यावर कारवाई करून सदरचा परिसर व पदपथ फेरीवाला मुक्त करण्यात आला. जांभळी नाका, ठाणा मार्केट, भाजी मार्केट, येथील अनधिकृत फेरीवाले, फळे व भाजीपाला विक्रेते यांच्यावर कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले.  

कोपरी उपप्रभात समिती क्षेत्रातील अष्टविनायक चौक, नारायण कोळी चौक, कपडा मार्केट येथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आले असून सदरचा परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला.

वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील रोड नंबर-१६, रोड नंबर-२२,पासपोर्ट कार्यालय, टोयोटा शोरूम व रोड नंबर-१६ सर्कल येथील अनधिकृत फेरीवाले व बेकायदेशीर पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करून सदरचा परिसर स्वच्छ व मोकळा करण्यात आला.

सदर कारवाईत रस्त्यावरील फेरीवाले, अनधिकृत पार्किंग व पदपथावरील फेरीवाले हटविण्यात आले. पोलिस प्रशासन व वाहतुक विभाग यांच्या समवेत करवाई करून सदर नियंत्रण करण्याकरिता दैनंदिन रित्या दोन सत्रात मनुष्य व तैनात करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत