नाराजी दूर करा.एकत्रितपणे जोमाने निवडणुकीच्या कामाला लागा

 


ठाणे.२९ ऑ.(प्रतिनिधी):काल कोकण विभागातील जिल्हा अध्यक्षांसह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक टिळक भवन,दादर येथे, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत , अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, कर्नाटकचे गृहमंत्री गंगाधरैया परमेश्वरा व कोकण चे प्रभारी बी एम संदीप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी कोकण विभागातील पक्षातील विधानसभेला इच्छुक परंतु उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांसह स्थानिक पक्ष नेते व कार्यकर्ते, महिला आघाडी व इतर विविध सेलच्या पदाधिकार्या सोबत संवाद साधत तिकीट वाटपाबाबत असलेली नाराजी दूर करण्यासाठी चर्चा करण्यात आली व आपापल्या मतदार संघात महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या.

      या वेळी उपस्थित जिल्हाध्यक्षांशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी फोनवर संवाद साधत जे काही मतभेद असतील ते विसरून निवडणुकीच्या कामात सक्रिय होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत