ठाणे आणि कळवा - मुंब्रा विधानसभेसाठी जिजाऊ संघटनेच्या उमेदवारांचा अर्ज दाखल !!!

 


ठाणे : जाहिर झालेल्या २०२४ विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे , याच पार्श्वभूमीवर जिजाऊ संघटनेचे अनेक उमेदवार कोकणातील वेगवेगळ्या भागातून अर्ज भरत आहेत . आज दिनांक २८ ऑक्टोंबर रोजी ठाणे विधानसभा मतदारसंघातून आरती ताई भोसले आणि कळवा – मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून ज्योत्स्ना ताई  हांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला .

 यावेळी जिजाऊ संघटनेच्या मोनिकाताई सांबरे उपस्थित होत्या. तसेच उमेदवारी अर्ज भरण्याआधी ठाणे शहरामध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये जिजाऊ संघटनेमधील अनेक महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला . जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था हि कोकणातील शिक्षण , आरोग्य , महिला सक्षमीकरण , रोजगार आणि शेती या पाच मुल तत्वांवर काम करते आणि जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे गरजू व्यक्तींना नेहमीच मदत करतात . २०२४ लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश सांबरे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, त्यावेळी जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना तब्बल अडीच लाख मतदान केल . त्याच विश्वासाची आता गरज आहे,  कोकणाच्या सार्वांगीण विकासाच्या हेतुने  जिजाऊ संघटना कोकणातील वेगवेगळ्या मतदारसंघातून आपले उमेदवार उभे करत आहे . जनता समाजासाठी जिजाऊने  केलेले काम लक्षात ठेवुन आम्ही उभ्या केलेल्या उमेदरावाला नक्की मतदान करेल असा विश्वास जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी व्यक्त केला .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत