संदीप गचांडे यांना 'ये गं ये गं परी' बालनाट्यासाठी सर्वोत्कृष्ट लेखकाचा प्रथम पुरस्कार

                                                 


महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २० व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत संदीप प्रभू गचांडे यांना 'ये गं ये गं परी' बालनाट्य लेखनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट लेखक प्रथम पुरस्कार सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते प्राप्त झाला. सदरचा पारितोषिक वितरण सोहळा स्वा. सावरकर स्मारक नाट्यगृह, शिवाजी पार्क, दादर येथे बुधवार दिनांक ०९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुंनगटीवार यांच्या उपस्थित पार पडला.

साईस्पर्श संस्था, ठाणे निर्मित 'ये गं ये गं परी' या बालनाट्याला अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट बालनाट्य तृतीय पारितोषिक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक वैभव सुरेश उबाळे यांना तृतीय पारितोषिक तसेच शरयू सहदेव गोसावी हिला सर्वोत्कृष्ट बालकलाकार रौप्य पदक मान्यवरांच्या हस्ते मिळाले.

साईस्पर्श संस्थेच्या संपूर्ण टीमने उपस्थित मान्यवरांचे तसेच महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आभार मानले व पुढेही भविष्यात सातत्याने सदरच्या स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत