कल्याण:- कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांच्या प्रचारार्थ शिवसेना शाखा भाल येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने प्रचार करून महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा निर्धार केला. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना उमेदवार सुभाष गणू भोईर यांनी भाल गावावर विशेष प्रेम असल्याचे सांगून भाल गावात महाविकास आघाडी एकत्रित येवून विजय निश्चित करेल असा विश्वास व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात भाल गाव व कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा रखडलेला विकास साधण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार आणणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.या बैठकीला तालुका प्रमुख मुकेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गणेश म्हात्रे, गजानन म्हात्रे,बाळाराम म्हात्रे, मधुकर म्हात्रे, माजी सरपंच विक्रम म्हात्रे, सुखदेव पाटील, रामकृष्ण म्हात्रे, पोलीस पाटील रुपेश म्हात्रे, भगवान म्हात्रे, युवासेना तालुका अधिकारी प्रदीप मढवि, शाखाप्रमुख निशांत म्हात्रे, माजी सरपंच राजेश फुलोरे, शाखा संगीटीका छाया म्हात्रे यांच्या सह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment