अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत कारवाई
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने वाशी विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सी विभाग वाशी अंतर्गत सेक्टर- 15 वाशी येथे श्री. शारजान गुलाब मुलानी, घर क्र. 1 व 2, सेक्टर- 15, वाशी, नवी मुंबई येथे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु होते. सदर अनधिकृत बांधकामास वाशी विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हुन हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत केलेले बांधकाम हटविले नाही.
सदर अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत तोडक मोहिमच आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. मा. आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांचे आदेशान्वये व उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार सी विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली सदरचे अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. या धडक मोहिमेसाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. या धडक मोहिमेसाठी एकूण 11 मजुर, 1 जेसीबी, 1 इलेक्ट्रिकल हॅमर व 1 गॅस कटर यांचा वापर करुन अनधिकृत बांधकाम निष्काशीत करण्यात आले आहे.
यापुढे देखील अशा प्रका

Post a Comment