आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धेत श्री मावळी मंडळ खेळाडू चमकले

 


ठाणे ः दिनांक 18 ऑक्टोबर आणि 19 ऑक्टोबर 2024 रोजी कर्मवीर भाऊराव पाटिल महाविद्यालय वाशी येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन ठाणे विभाग  खो खो स्पर्धेमध्ये आपल्या श्री मावळी मंडळ संस्थेतील पुरुष गटातील खेळाडू कु. आयुष राव ह्याने ज्ञानसाधना महाविद्यालय तर्फे प्रतिनिधित्व करीत तृतीय क्रमांक पटकावला, महिला गटात कु. सानिया मोरे हिने जोशी बेडेकर महाविद्यालय तर्फे प्रतिनिधित्व करीत द्वितीय पारितोषिक पटकावले तर पुरुष गटातील खेळाडु कु. शुभम जाधव, कु. देवेश देशमुख आणि कु. प्रज्वल महाडिक ह्यांनी सुद्धा जोशी बेडेकर महाविद्यालय तर्फे प्रतिनिधित्व करून द्वितीय पारितोषिक पटकावले असून मुंबई विभागा करीता कु देवेश देशमुख आणि कु शुभम जाधव ह्यांची निवड करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत