मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा शिवसैनिकांचा ठाण्यात जल्लोष
ठाणे- `अमृतातेही पैजे जिंका' असे ज्ञानेश्वर माऊलंनी जिचे वर्णन केले आहे त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासानाने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत आज शिवसेनेने आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटून जल्लोष केला.
मराठी या अद्धितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी तमाम महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ. मिनाक्षी शिंदे, शिवसेना कोपरी पाचपाखाडी शहरप्रमुख राम रेपाळे, शिवसेना ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, ओवळा माजीवाडा शहरप्रमुख राजू फाटक, शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी, माजी जेष्ठ नगरसेवक संजय भोईर, विकास रेपाळे, एकनाथ भोईर, शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरु होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला होता. निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आग्रह धरला होता. घटस्थापनेच्या मुहूर्तावर केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबर जागतिक पातळीवर मराठी भाषा पोहोचण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री श्री. तोमर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने खासदार यांनी आभार मानले आहेत.

Post a Comment