मतदान जनजागृतीबाबत शिक्षकांच्या सहविचार सभेचे आयोजन

 



ठाणे (जिमाका) - १४९ कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामधील शाळांमध्ये मतदान जनजागृती उपक्रम राबविण्याबाबत आज सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार बैठक पार पडली.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने जनजागृती करण्याबाबतचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.

या सभेस १४९ कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील स्वीपचे सर्व सदस्य, तसेच अनुदानित व विनाअनुदानित शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या सहविचार सभेस स्वीपचे राजेंद्र गिरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच जनजागृती कोणकोणत्या माध्यमातून करावी याची माहिती दिली. लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार हा सर्वांनी बजावावा याबाबतची शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली.

या सहविचार सभेस नोडल  स्वीपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत