महाराष्ट्रातील प्रशिक्षक देवकी राजपूत-भापकर यांच्या नेतृत्वाखाली स्पेनमधील U20 कुस्ती विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारतीय कुस्तीगिरांची उल्लेखनीय कामगिरी

 



 Mपोंटेवेद्रा, स्पेन - ८ सप्टेंबर २०२४:

नुकताच 2 ते 8 सप्टेंबर या कालावधी मध्ये पोन्टेवेद्रा, स्पेन येथे पार पडलेल्या 

  U20 कुस्ती विश्व चॅम्पियनशिपमध्ये

 भारताच्या U20 कुस्ती संघाने दरम्यान  उत्कृष्ट कामगिरी केली.  

   

    या स्पर्धेत विविध 26 देशांमधून खेळाडू सहभागी झाले होते, ज्यामध्ये भारताच्या 10 महिला खेळाडू व 20 पुरुष खेळाडूंनी (10 फ्रीस्टाइल आणि 10 ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये) भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 

   भारतीय संघाच्या प्रशिक्षक देवकी राजपूत यांच्या नेतृत्वाखाली, संघाने 5 पदके पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली आणि एकूण सांघिक चॅम्पियनशिप मध्ये दुसरे स्थान पटकावले, ज्यामुळे जागतिक कुस्ती मंचावर भारताची वाढती प्रतिष्ठा मजबूत झाली.


      प्रशिक्षक देवकी या महाराष्ट्रातील एकमेव कुस्ती पटू आहे ज्यानी (NIS) कुस्ती प्रशिक्षक होणेसाठी पतीयाळा (पंजाब राज्य) येथील 01 वर्षाचा (NIS) एन.आय.एस (2020-21) हा डिप्लोमा कोर्स ‘‘A’’ ग्रेडने उत्तीर्ण केला आहे.  तसेच देवकीने कुस्तीचा UWW लेव्हल 1 कोर्स 

फर्स्ट ग्रेडने पूर्ण करून त्यांच्या या ज्ञानाचा वापर त्यांनी त्यांच्या कुस्ती प्रशिक्षणा मध्ये केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम होऊन कुस्ती गिरांचे खेळामधील कौशल्य अजून विकसित होण्यास मदत झाली परिणामी 

भारत हा उत्कृष्ट निकाल साध्य करू शकला.

       प्रशिक्षक देवकी राजपूत या 

महाराष्ट्र महिला कुस्ती पोलीस संघाचे प्रशिक्षक देखील आहेत. भारतीय संघाच्या प्रशिक्षक देवकी राजपूत या स्वत: राष्ट्रीय पदक विजेत्या कुस्तीपटू असून त्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत वागळे इस्टेट पोलीस ठाणे येथे कार्यरत आहे.   

      देवकी यांनी आत्तापर्यंत एकुण सात वेळा महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा मध्ये जु-दो व कुस्ती या खेळामध्ये सलग सुवर्ण मेडल पटकावले आहेत. 

      त्यांच्या या यशाची दखल घेत सन 2019 मध्ये कुस्ती व जुडो मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाकडून *उत्कृष्ट खेळाडू* म्हणून पुरस्कार देण्यात आला होता तसेच *मा पोलीस महासंचालक पदकाने* देखील त्यांना गौरवण्यात आले आहे. 

          भारतीय कुस्तीगीरांच्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना त्यांनी "माझे वडील व judo प्रशिक्षक श्री देवीसिंग राजपूत तसेच माझे गुरू आणि महाराष्ट्र कुस्ती राज्य संघटनेचे त्यांच्या अतुट पाठिंब्याबद्दल विशेष आभारी असल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली. 

         प्रशिक्षक देवकी राजपूत आणि त्यांच्या टीमचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत