पत्रकार डॉ. प्रशांत सिनकर यांना मातृ शोक

 


ठाणे -ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रशांत सिनकर यांच्या मातोश्री रेखा रवींद्र सिनकर यांचे मंगळवारी (ता.२४) निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी त्यांच्या पार्थिवावर कोपरी येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार झाले. यावेळी पत्रकार, राजकीय, शासकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. मृत्यू दरम्यान त्यांचे वय ८० वर्षे होते. ठाणे पश्चिम येथील वीर सावरकर नगरात त्या वास्तव्याला होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत