आदरणीय नितीन गडकरींना खुले पत्र !

 




सर, मी व माझ्या परिवाराने काल ‘अटल सेतू’वरून प्रवास केला. त्याआधी बांधलेल्या अनेक हाय वे वरून, टनेल, उड्डाणपुलांवरून माझा प्रवास झाला आहे.

आज मी खुले पत्र यासाठी लिहित आहे की, सध्या ‘पितृपक्ष’ सुरू आहे. आपल्या पुर्वजांना जेवू घालण्याचा महिना. जिवंतपणी सेवा केली नसेल, त्यापेक्षा जास्त सेवा आता ‘मरणोत्तर’ चाललेली आहे.
गरिब, श्रीमंत, नेते, संस्थानिक, उद्योगपती तथा स्वयंघोषित राजे - महाराजे या पितृपक्षात आठवले - पुजले जातात.
नितीनजी,
मुळ विषयावर येतो. राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून जावून जवळपास साडेतीनशे वर्षे लोटली. राजांची इतक्या वर्षांनंतर सुद्धा आठवण येते. पुजा कराविशी वाटते. पुढे चार हजार वर्षे ते आपल्या हृदयात राहतील.
माझ्या मनाला अत्यंत सोपा प्रश्न स्पर्शून गेला. राजे महान होते, आहेत   व राहणार! राजांचे सेनापती जे याच मातीतून उभे राहिले व अजरामर झाले.
तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, येसाजी कंक. शेकडो नांवे अशी आहेत की ती हृदयपटलावरून दूर जात नाहीत.
नितीनजी, भारत स्वतंत्र झाला. 75 वर्षे लोटली. राजांकडे काहीही अत्याधुनिक साधन-सामुग्री नसताना राजे साडेतीनशे वर्षे स्मरणात राहतात. अलिकडच्या सत्तेत व सत्तेत वावरणार्‍या नेत्यांकडे ‘सर्व काही’ आहे. तरीही ‘एक माणूस’ 75 वर्षे डोळ्यासमोर उभा राहत नाही. तयांना शक्य झालं नाही की त्यांची इच्छाशक्ती नव्हती?
नितीनजी,
तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कृतीतून दिलं म्हणून हे खुलं पत्र! आज ‘अटल सेतु’च काय देशाचे अनेक टनेल, उड्डाणपुल, महामार्ग, नितीन... नितीन... म्हणत आपल्या अंगाखांद्यावर शेकडो वाहनांचा व वाहनांमधून प्रवास करणार्‍या हजारो - लाखो - करोडो प्रवाशांचा बोजा आनंदाने वाहतात.
मृत्यू हे ‘अंतिम सत्य’ आहे. मृत्यू तुम्हालाही आहे व मलाही आहे. जो ‘सजीव’ आहे तो एक दिवस ‘निर्जीव’ होणारच! परंतू निर्जीव अवस्थेनंतर जो माणूस ‘चिरंतन स्मरणात’ राहील तो ‘दीपस्तंभ’ म्हणजे ‘नितीनजी गडकरी’!
नेता, अभिनेता, चाहता गेला की फार तर 13 दिवस, 13 महिने समरण होतं. तेही कुटुंबियांनी जाहिरातीद्वारे कळविले तर...! अभिनेत्याची ‘चित्रफित’ असते म्हणून थोडा अधिक काळ! नेत्यांना, मंत्र्यांना, आमदार - खासदारांना कुणीच 15 दिवसांपेक्षा जास्त कुणी स्मरणात ठेवत नाही.
नितीनजी, तुम्हाला मात्र लोक, जनता, रयत, 100 वर्षे स्मरणात ठेवणार आहे. तुम्ही उभारलेल्या ‘वास्तु’ किमान 100 वर्षे  उभ्या राहतील. कुणी उभारल्या? नितीन गडकरी! काय सुंदर उड्डाणपुल आहे. कुणाच्या काळात झाला? नितीन गडकरी! हा महामार्ग स्वर्गीय सुखाचा आनंद देतोय. कुणी तयार केला? नितीन गडकरी! अरे हा ‘टनेल’ एक ‘जागतिक आश्चर्य’ आहे. कुणाची कल्पना? नितीन गडकरी!
सांगा वाचकहो, महाराष्ट्रावर 65 वर्षे राज्य करणार्‍या कुणा नेत्याचे स्मरण होतंय? यापुढे होत राहील? एकही नाही! आले... सत्ता ‘भोगली’! पैसे कमविले!! दंगली घडवून आणल्या! जाती-धर्माचं राजकारण केले! दहा पिढ्या ‘ऐतखाऊ’ बनविल्या! प्रॉपर्टी - पैसा गडगंज कमविला.  गेला ‘बिचारा’! बिचारा यासाठी की लोक रोज देवाला हा जोडत होते. उचल बाबा याला!
विनोद नाही! नितीनजी, संपूर्ण भारतवासियांचे आयुष्य तुम्हाला लाभो. इतकं ‘महान’ काम या देशात तुमच्याकडून झालंय. होत आहे. तुमच्या अभिनंदनासाठी हे खुलं पत्र! चुक भुल द्यावी - घ्यावी!
आ. चाहता
मधुकरराव मुळूक - ठाणे
शब्दांकन - मधुकरराव मुळूक/9821540607

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत