देशासाठी समर्पित माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम साहेब यांची व आतंकवादी ओसामा बिन लादेन याची तुलना करणे हाच राष्ट्रद्रोह !

 



सौ ॠताताई जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा !
प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे मागणी


प्रतिनिधी / ठाणेदेशासाठी समर्पित माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम साहेब यांची व आतंकवादी ओसामा बिन लादेन याची तुलना करणे हाच राष्ट्रद्रोह आहे.अशी तुलना करणाऱ्या सौ ॠताताई जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे.


बुधवारी, २५ सप्टेंबर २०२४ रोजी नुरबाग हॉल, तलावपाळी, कौसा, मुंब्रा येथे महिला आणि विद्यार्थिनी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन एमएसपी केअर फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून संसदरत्न, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा उपस्थितांना संबोधित केले. प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री स्वरा भास्कर उपस्थित होत्या.तर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुविद्य पत्नी सौ. ॠताताई जितेंद्र आव्हाड या त्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमात महिला आणि मुलींना मार्गदर्शन करताना सौ. ॠताताई जितेंद्र आव्हाड यांनी, जगातील सर्वात आतंकवादी ज्याने अलकायदा या दहशतवादी संघटनेची स्थापना केली, त्या ओसामा बिन लादेन आणि ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतासाठी समर्पित केले ते माजी राष्ट्रपती, मिसाईलमॅन एपीजे अब्दुल कलाम यांची तुलना केली. ओसामा बिन लादेन हा परिस्थितीने, समाजाने आतंकवादी झाला अशाप्रकारचे तारे सौ. ॠताताई आव्हाड यांनी तोडले. मुळात ओसामा बिन लादेन याचा जन्म सौदी अरेबिया या देशातील रियाथ येथे अत्यंत श्रीमंत अशा लादेन कुटुंबात झाला होता. समाजाने, परिस्थितीने ओसामा बिन लादेन हा आतंकवादी झाला नाही. संपूर्ण जगात जिहाद पसरवून त्याने जगभरात आतंकवादी कृत्य केले. ११ सप्टेंबरला वर्ड ट्रेड सेंटर वर जो हल्ला झाला ज्यात तीन हजार लोकांचे जीव गेले. हा आतंकवादी हल्लाही ओसामा बिन लादेन याने केला होता. यामुळे ओसामा बिन लादेन याचे उदात्तीकरण करुन त्याची तुलना ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले त्या माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी करणे हा देशद्रोह आहे. तामिळनाडू मधील रामेश्वर येथे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला, कॉन्टम फिजीक्स मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डीआरडीओ) आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) मध्ये अत्यंत मोलाची अशी त्यांची कामगिरी होती. मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये भारताला अग्रेसर करण्यामध्ये एपीजे अब्दुल कलामसाहेबांचे नाव होते. पोखरण अणुचाचणी झाली यामध्ये अत्यंत मोलाची भूमिका एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी बजावली होती. असे असताना आतंकवादी ओसामा बिन लादेन व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम या दोघांची जी काही तुलना सौ ॠताताई जितेंद्र आव्हाड यांनी केली त्या तुलनेची राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहे. तसेच ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे साहेबांना विनंती करतो की या संपूर्ण कार्यक्रमाचे रेकॉर्डींग त्यांनी चेक करावे आणि राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सौ ॠताताई जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करावा. भारतासारख्या देशामध्ये ओसामा बिन लादेनचे उदात्तीकरण करणे, त्याचे उदाहरण येणाऱ्या पिढीसमोर देणे यासाठी सौ ॠताताई जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाची तक्रार किंवा गुन्हा ठाणे पोलिसांनी केला पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट मागणी आहे. याबाबतचे पत्र ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना दिले जाणार आहे, ओसामा बिन लादेन या आतंकवादीच्या पुस्तकाचे उदाहरण देण्यापेक्षा

विन्ग्ज ऑफ फायर हे एपीजी अब्दुल कलाम साहेबांवर लिहिलेले पुस्तक सौ ॠताताई जितेंद्र आव्हाड यांनी वाचायला सांगायला हवे, त्यांचे उदाहरण द्या, ओसामा बिन लादेन याचे उदाहरण देणे हाच राष्ट्रद्रोह आहे, देशद्रोह आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी शेवटच्याक्षणी त्यांना कार्डियाक अरेस्ट झाला असतानाही ते इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, शिलॉन्ग येथे लेक्चर देत होते. संपूर्ण आयुष्य त्यांनी देशासाठी समर्पित केले त्यांची आणि ओसामा बिन लादेन याची तुलना करणे हाच राष्ट्रद्रोह आहे, अशी स्पष्ट भूमिका प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मांडली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत