‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानात बेलापूरसह नेरूळ व वाशी येथे ‘डीप क्लिनींग ड्राईव्ह’

 


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असून त्यामध्ये लोकसहभागावर भर दिला जात आहे.

या अनुषंगाने आज बेलापूर, नेरूळ व वाशी विभागात अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे यांच्या नियंत्रणाखाली विशेष सखोल स्वच्छता मोहीम अर्थात डीप क्लिनींग ड्राईव्ह राबविण्यात आले.

यामध्ये बेलापूर विभागात आम्र मार्ग येथे विशेष सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये नवीन यांत्रिकी सफाई वाहनांचा वापर करण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या उपस्थितीत राबविण्यात आलेल्या या मोहीमेत महापालिका स्वच्छताकर्मींसह एनएसएसचे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. या अंतर्गत उरण हायवे व त्या बाजूच्या पदपाथच्या कडेला असलेले गवत काढण्यात आले तसेच प्लास्टिक, कागद, कापडाचे तुकडे असा कचरा गोळा करण्यात आला व परिसर स्वच्छता करण्यात आली. बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल व स्वच्छता अधिकारी श्री.सूर्यकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून सर्व स्वच्छता निरीक्षक व स्वच्छतामित्रांसह ही सखोल स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली.  

अशाच प्रकारे नेरूळ विभाग कार्यालयामार्फत डी.वाय.पाटील स्टेडियम समोर सायन पनवेल हायवे तसेच एलपीनाका ते पुढारी प्रेस रोड आणि लगतची मोकळी जागा याठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नेरूळ विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी श्री. अरूण पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या मोहीमेत महापालिका स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षकांसह स्वच्छताकर्मी आणि एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  

वाशी विभागातही सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री.सागर मोरे आणि स्वच्छता अधिकारी श्री.सूर्यकांत म्हात्रे यांच्या पुढाकारातून स्वच्छता निरीक्षक व स्वच्छताकर्मींच्या माध्यमातून सेक्टर 8 सागर विहार परिसरात डीप क्लिनींग मोहीम राबविण्यात आली.

नियमित स्वच्छतेप्रमाणेच अशा प्रकारच्या विशेष सखोल स्वच्छता मोहीमांच्या माध्यमातून दुर्लक्षित व पडीक जागांच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत