श्रावणरंगात रंगली तरुणाई' कल्याणच्या के. एम. अग्रवाल महाविद्यालयात श्रावणरंग महोत्सव साजरा

 



कल्याण  : श्रावण महिना म्हणजे निसर्गाची समृद्धी, सांस्कृतिक सण-उत्सव यांचा आनंद अनुभवण्याचा काळ. आजच्या तरुणाईला आजच्या आकर्षणामधून बाहेर काढून या आनंदाकडे वळवणे ही किमया या श्रावणरंग महोत्सवात साधली गेली.

के. एम. अग्रवाल महाविद्यालयात `अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष', (IQAC) मार्फत, श्रावण महिन्यात `श्रावण रंग महोत्सव'  साजरा केला गेला.
८ ऑगस्ट रोजी श्रावणातील `रानभाज्या महोत्सव', साजरा झाला. जवळ-जवळ २५ आदिवासी महिलांच्या उपक्रमशीलतेला चालना देत रान भाज्यांची विक्रीचे स्टॉल तसेच तयार 'रानभाजी-भाकरी'चे स्टॉल महाविद्यालयात लावण्यात आले. याचबरोबर या भाज्यांचे औषधी महत्त्व तसेच आहारातील त्यांचे घटक पूर्ण महत्त्व स्पष्ट करणारे पोस्टर प्रदर्शन सुध्दा आयोजित केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून स्वाती देशपांडे, उपायुक्त केडीएमसी, सुप्रिया देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कल्याण, तसेच प्रशांत गवाणकर, समाज विकास अधिकारी, केडीएमसी लाभले होते.
१२ ऑगस्ट रोजी, 'एक हजार सूर्य नमस्कार' या संकल्पाचे आयोजन केले होते. प्राध्यापिका सौ. कुलकर्णी, मेनन महाविद्यालय, मुंबई, यांनी विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेतली.
१३ ऑगस्ट रोजी `श्रावण रूची महोत्सव', आयोजित केला होता. श्रावणातील उपवासाचे पदार्थ असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. उपवासाचे पदार्थांच्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भरीव सहभाग नोंदविला.
१६ ऑगस्ट रोजी, `ऐतिहासिक मंदिर भेट', कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराला जवळ जवळ ९५ विद्यार्थ्यांनी भेट दिली.
२० ऑगस्ट रोजी, ग्रीन डे अंतर्गत परीसरातील महाविद्यालयात `फळ व फुलांच्या बीजांचे वितरण', हे कार्यक्रमाचे स्वरूप होते.
२१ ऑगस्ट रोजी, `औषधी वनस्पतींचे प्रदर्शन', तसेच `औषधी वनस्पतींचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व', यावर व्याख्यान आयोजित केले होते. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अमीता कुकडे, उपाध्यक्ष, निमा महिला फोरम, महाराष्ट्र राज्य यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या बाबतीत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सांगता कला विभागाच्या सहभागाने आयोजित  ३० ऑगस्ट रोजीच्या `श्रावणसरी', या कलाविष्काराने झाली. या अंतर्गत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या गायन, नृत्य सारख्या कला आविष्कारांना चालना देणारा कार्यक्रम आयोजित केला गेला.
`श्रावण रंग महोत्सव-२०२४-२५', चा उद्देश हा विद्यार्थ्यांचे मूल्यवर्धन, पर्यावरण संवर्धनआणि सामाजिक जागृती, समाजभान जाणीव हा होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत