लेट्स इमॅजीनच्या बाप्पा साहित्य प्रसादाचे वितरण विक्रमगड व वाड्यातील शाळांना प्रसादाचा लाभ
मुंबई, दि. (प्रतिनिधी) :
दहिसर मधील लेट्स इमॅजिनच्या बाप्पा साहित्य प्रसादाचे नुकतेच विक्रमगड मधील मागी पाडा, सावरखिंड, सावे पाडा, सावरोली, रडेपाडा , भंडार पाडा, कावळे पाडा, टोपलेपाडा, जांभे, सुकसाळे, बोरसेपाडा तर वाड्यातील कोलीम सरोवर, बालिवली, मोज, वडवली, निहळी, वडवली, कशीवली, वरई बुद्रुक आणि तुसे या जिल्हा परिषदेतील शाळेतल्या मुलांना वितरण करण्यात आले. या उपक्रमाबद्दल माहिती देताना लेट्स इमॅजिन च्या पूर्णिमा नार्वेकर यांनी सांगितले कि, गणपतीत बाप्पाच्या दर्शनाला येतांना फळं, मिठाई प्रसादासाठी आणण्याऐवजी वह्या, पेन्सिल, पेन, पट्टी, स्केचपेन, असे शैक्षणिक साहित्य आणा, जे वाडा आणि विक्रमगड या आदिवासी भागात असलेल्या शाळांमधील आपल्या छोट्या दोस्त मंडळींना देता येतील, असे आवाहन आमच्या संस्थेने केले होते. गेली ६ वर्ष आम्ही हा उपक्रम राबवित आहोत. अनंत चतुर्दशी पर्यंत आमच्या सोबत जवळपास २२ जणांनी सहभाग घेतला. या सर्व वस्तू एकत्रित करून त्याचे वर्गीकरण करून मग त्याचे वाटप करण्यात येते. या वेळी शैक्षणिक साहित्याबरोबर खेळाचे साहित्य, सतरंज्या, रुमाल, वॉटर बॉटल, कलर इत्यादी आवश्यक वस्तू सुद्धा प्रसाद म्हणून आल्या होत्या.
बाप्पा साहित्य प्रसाद नंतर आता दिवाळीत आनंदी दिवाळी हा उपक्रम आम्ही करणार आहोत असं हि पूर्णिमा नार्वेकर म्हणाल्या. या शाळेतील मुलांकडून पणती रंगविणे, बुक मार्क पेंटिंग, शुभेच्छा कार्ड, एनवल प पेंटिंग असे या उपक्रमाचे स्वरूप असेल. या उपक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सौ. पूर्णिमा नार्वेकर यांच्या समवेत ९८२०००३८३४ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment