गुड टच, बॅड टच करू नये हे शिकवण्याची गरज - न्यायमूर्ती गौरी गोडसे
नवी मुंबई
लहान मुलांना गुड टच, बॅड टच कसा ओळखावा याविषयी अनेक संस्था जनजागृती करतात ही नक्कीच चांगली बाब आहे; पण आता या संस्था, शिक्षक आणि पालकांनी अशा प्रकारचे टच करूच नये असेही शिकवणे गरजेचे झाले आहे. केवळ लहान मुलांनाच नव्हे तर शिक्षक आणि त्यांच्या पालकांनाही याबद्दल माहिती देणे आवश्यक आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी व्यक्त केले. रबाळे येथील महा कायदेशीर शिबिरात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. येथील राजश्री शाहू महाराज या महापालिकेच्या शाळेमध्ये हे महाशिबिर भरवण्यात आले होते.
शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात, तळागाळातील प्रत्येक नागरिकाला कायदेविषयक माहिती मिळावी, त्याच्या अधिकार कळावेत यासाठी ठाणे जिल्हा विधी सवा प्राधिकरणाच्या वतीने कायदेविषयक महा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महाशिबिरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गौरी गोडसे, ठाणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे हे प्रमुख मान्यवरांसह ठाणे, बेलापूर न्यायालयाचे न्यायाधीश, ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ईश्वर सूर्यवंशी, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सुधाकर सोनवणे, विविध संस्थांचे प्रतिनिधी शालेय विद्यार्थी, शिक्षक, कायदा विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या हस्ते महाशिवराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते रोपांना जल अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गौरी गोडसे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महा शिबिरामध्ये आयोजन बघून न्यायमूर्ती गोडसे यांनी सर्व आयोजकांचे कौतुक केले. अनेक योजना मलाही माहित नव्हत्या, त्या येथील स्टॉलला भेटी दिल्यानंतर समजल्या असे सांगून संविधानाने नागरिकांना दिलेल्या आर्थिक, सामाजिक या सारख्या मूलभूत अधिकारांना शासनाने तळागाळापर्यंत पोहोचवायला पाहिजेत, ते अशा महा शिबिरातून पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय याबद्दल आनंद वाटत असल्याचे म्हणाले. नागरिकांच्या अधिकाऱ्यांसोबतच त्यांच्या कर्तव्य आणि त्यांच्या चुका सुद्धा दाखवणारे स्टॉल अशा ठिकाणी यापुढे लागायला हवेत अशी अपेक्षा न्यायमूर्ती गोडसे यांनी व्यक्त केले. शालेय मुलांबद्दल बोलताना त्यांनी अशा मुलांसाठी त्यांचे पालक संस्था शिक्षक गुड टच याबाबत माहिती देतात. आता अशा माहिती सोबतच त्यांनी असे टच करू नये याची देखील माहिती देणे आवश्यक आहे असेही त्या म्हणाल्या. या महा शिबिरामध्ये संस्था विविध आस्थापनांचे २३ स्टॉल मांडण्यात आले होते. शाळेच्या आवारात न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षारोपण

Post a Comment