महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होणेबाबत.

 


      गणेशोत्सव सण हा राज्यामध्ये अत्यंत मोठया स्वरुपात साजरा करण्यात येतो. राज्यात गणेशोत्सव साजरा करत असतांना पर्यावरण पुरक, सामाजिक सलोखा, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व सार्वजनिक स्वच्छता विषयावर अधिक भर देत शासनाबरोबरच विविध गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातुन सामाजामध्ये प्रबोधन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

      या शासन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येईल. सहभागी होणा-या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास परीक्षण समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. 

      याकरिता राज्यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, पुणे व ठाणे जिल्हयातुन प्रत्येकी 3 व अन्य जिल्हयातून प्रत्येकी 1 उत्कृ्ष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करण्यात येणार आहे. याकरिता ठाणे जिल्हयातील प्रत्येक महानगरपालिकांसाठी स्वतंत्र महानगरपालिका क्षेत्रीय निवड समिती निश्चित करुन दिलेली आहे. या निवड समितीव्दारे राज्यातील उत्कृष्ट अशा 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करुन त्यापैकी संपुर्ण राज्यातील पहिल्या 3 विजेत्यांना प्रथम रु.5,00,000/-, व्दितीय रु.2,50,000/-, तृतीय रु.1,00,000/- आणि उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रत्येकी रु.25,000/- चे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

      यास्तव यास्पर्धेत सहभागी होण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे दि.31/07/2024 रोजीचे शासन निर्णयाचे अवलोकन करावे. त्यामधील बाबींची पुर्तता करणा-या /करु शकणा-या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने परिशिष्ट “अ” मधील विहित नमुन्यातील अर्ज भरुन पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इ-मेलवर दि.31/08/2024 पुर्वी ऑनलाइन अर्ज करु शकता. राज्य शासनाव्दारे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावेत असे नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना याव्दारे आवाहन करण्यात येत आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत