कावेरी नाखवा या महिलेला गाडीने चिरडणाऱ्या राक्षसीवृत्ती असलेल्या मिहीर शहाला फाशी द्या ...ठाण्यात शिवसेना महिला आघाडीकडून या घटनेचा निषेध
ठाणे - कावेरी नाखवा कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे, वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि कावेरी नाखवा यांना चिरडणाऱ्या मिहीर शहाला फाशी द्या अशी जोरदार मागणी करत ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रणरागिणीनी आज आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आले. या मागणीचे निवेदन महिला आघाडीने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना दिले. यावेळी जिल्हा संघटक रेखा मोहन खोपकर, मा. नगरसेविका नंदिनी विचारे, उप जिल्हा संघटक अॅड. आकांक्षा आत्माराम राणे, श्रीमती. संपदा पांचाळ, महेश्वरी संजय तरे, मंजिरी ढमाले, ज्योती कोळी, शहर संघटक प्रमिला शिवाजी भांगे, वैशाली शिंदे, पुष्पलता भानुशाली, विधानसभा क्षेत्र संघटक विद्या यशवंत कदम, विभाग संघटक राजेश्री सुर्वे, स्नेहा पगारे, उषा बोरुडे, वैशाली मोरे, विभाग समन्वयक नीलिमा शिंदे, उप शहर संघटक अनिता प्रभू, ज्योती दुग्गल, सुप्रिया गावकर तसेच इतर शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होते.
वरळीमध्ये भल्या पहाटे बेदरकारपणे गाडी चालवून कावेरी नाखवा या महिलेला चिरडण्यात आले. आरोपी मिहीर शहा हा मिंधे गटाचे पालघरचे जिल्हाप्रमुख राजेश शहा यांचा मुलगा असल्याने तब्बल ६० तासानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या रक्ताच्या नमुन्यात मद्याचे अंश सापडू नयेत म्हणून मंत्र्यांनी पोलिसांनवर राजकीय दबाव टाकून शोधकार्य करण्यास विलंब लावून मोठे षडयंत्र रचले असल्याचा आरोप यावेळी महिला शिवसैनिकांनी केला. तसेच मुंबई पोलीस सराईत गुन्हेगाराला तात्काळ पकडू शकतात तर या मुजोर मिहीर शहाला पकडण्याकरिता तीन दिवस का लागले ? यासाठी कोणत्या राजकीय बड्या नेत्याचा दबाव होता ? हे महाराष्ट्रासमोर आलेच पाहिजे.
तसेच मतांसाठी आपल्या लाडक्या बहिणीचा वापर करणारे मुख्यमंत्री आता वरळी मधील कावेरी नाखवा या लाडक्या बहिणीला न्याय देणार का ? असा सवाल देखील आंदोलनकर्त्या महिला शिवसैनिकांनी यावेळी केला.
*शहांच्या अवैध धंद्यावर तत्काळ कारवाई करा.*
अशा गुन्हेगारीची पुनरावृत्ती होऊ नये व हा खटला फास्ट ट्रॅक वरती चालवून मानवरुपी राक्षस प्रवृत्तीच्या मिहीर शहाला फाशीच झाली पाहिजे. तसेच शहा कुटुंबीयांच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीने आपल्या निवेदनात केली आहे.

Post a Comment