आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ठाणे शहर (जि.) काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न





ठाणे दि.24 जून (प्रतिनिधी) टिळक भवन,दादर येथे अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव के.सी वेणूगोपाल आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रांताध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रदेश काँग्रेस विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत निर्धारित ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ची कार्यकारणी बैठक ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व ठाणे जिल्हा प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर, प्रदेश सरचिटणीस सहप्रभारी चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव संतोष केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत  वसंतराव नाईक सभागृह येथे संपन्न झाली.

             महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील जनतेने बी.जे.पी सरकारला नाकारल आहे आणि जनता यांना कंटाळली आहे हे लोकसभा निकालावरून दिसते असे यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष  ठाणे प्रभारी शरद अहेर यांनी सांगितले .तसेच येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आपल्याला आणायचे आहे त्यामुळे ब्लॉक तसेच आघाडी व सेलच्या बैठका व बूथ स्तरीय रचना त्यांच्या बैठका,नवीन मतदार नोंदणी, बीएलए  च्या बैठका यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे. आणि गतकाळात  या भ्रष्ट सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेला झालेला त्रास याबाबत येणाऱ्या काळात करावयाचे आंदोलने, रॅली इत्यादी बाबत सविस्तर चर्चा करून त्याची माहिती देखील दिली व याबाबत लवकरात लवकर निर्देशित कार्य बैठका पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाकडे पाठवावा अशा सूचना देखील दिल्या.

          तसेच काँग्रेस च्या प्रत्येक कार्यकर्त्याने जशी लोकसभा आणि पदवीधर निवडणुकीमध्ये मेहनत करून जास्तीत जास्त मताधिक्य मिळविण्यासाठी प्रयत्न केले त्याप्रमाणेच मी स्वतःहा आमदारकीचा उमेदवार आहे असे समजून प्रत्येक कार्यकर्त्याने काम करायचे आहे कारण जनतेचा विश्वास हा काँग्रेस पक्षावर आहे आणि हा विश्वास सार्थ करण्याचे काम आपल्याला करायचे आहे असे यावेळी बोलताना प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.तसेच ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाणे काँग्रेस च्या ब्लॉक ची संख्या दोन ने वाढविण्यात आली असून ती पदे लवकरच भरण्यात येतील. तसेच उत्तर भारतीय सेलचे अध्यक्षपदी संजय यादव तसेच ब्लॉक क्रमांक 11 च्या अध्यक्षपदी यासीन मोमीन यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे सांगितले

         यावेळी सदर बैठकीला प्रदेश सचिव मनोज शिंदे,प्रदेश पदाधिकारी भालचंद्र महाडिक,निशिकांत कोळी,जे.बी यादव, सुखदेव घोलप,रमेश इंदिसे , शीतल अहेर,ज्येष्ठ नेते सुरेशभाई ठाणेकर,प्रभाकर थोरात,मोहन तिवारी, निलेश शेंडकर,बाळासाहेब भुजबळ,महिला अध्यक्ष स्मिता वैती,शिल्पा सोनोने,सेवादल अध्यक्ष रवी कोळी,युवक काँग्रेस चे आशिष गिरी यांचेसह ब्लॉक अध्यक्ष,सेल/विभाग अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत