क्षयरोग मुक्त ठाणेसाठी रोटरी क्लब व ठाणे पालिकेचा पुढाकार



प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी आवाहन केल्याप्रमाणे क्षयरोगमुक्त भारत मोहिमेअंतर्गत क्षयरोगमुक्त ठाणे साठी ठाणे महापालिकेबरोबर रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. क्षयरोग झालेल्या व्यक्तीला औषधोपचारासोबत पोषक आहाराची देखील गरज असते हे ध्यानात ठेऊन महापालिकेने नि-क्षय मित्र नावाने कुटुंबियांना महिन्याचे रेशन पोषक आहार मोफत देण्याजा उपक्रम सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राबविला जातो.

रोटरीच्या डिस्ट्रक्ट ३१४२ च्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १७५ कुटुंबाना नि क्षय आहाराचे वाटप करण्यात आले. पालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास पालिकेतर्फे अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, पालिका उपायुक्त उमेश बिरारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नितील के , क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद पाटील, रोटरी इंटरनॅशनलचे माजी संचालक अशोक महाजन,  रोटरी डिस्ट्रीक्ट ३१४२ चे  गर्व्हनर दिनेश मेहता,  सचिन भोले, अध्यक्ष रोटरी प्रेसीडन्ट क्लब डॉ. सोनल बांगडे, विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष व सभासद उपस्थित होते. रोटरी गर्व्हनर दिनेश मेहता यानी याप्रसंगी सांगितले की, जुलै महिन्यात रोटरीची नवीन कार्यकारीणी स्थापन होऊन नवीन वर्षाला सुरूवात होते. या वर्षी विविध सामाजिक उपक्रमासोबत निक्षय मित्रसाठी १००० कुटुंबाना शिधा वाटप करण्यात येणार असून पहिला टप्पा म्हणून १७५ कुटुंबाना याचे आज वाटप करण्यात आले. ठाणे क्षयरोगमुक्त करण्यासाठी ठाणे पालिकेबरोबर रोटरीचे देखील योगदान असणार आहे. यावेळी सदर प्रकल्पासाठी सहकार्य केलेल्या रोटरी संस्था व व्यक्ती यांचा पालिकेतर्फे प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रिमियम यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत