ठाण्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अबॅकस ऑलिम्पियाड स्पर्धेत श्रुती पांडे दुसरी

 



ठाणे : संत ज्ञानेश्वर नगरातील संकल्प इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता ७ वी मध्ये शिकणारी मैत्री सेवाभावी संस्था फाऊंडेशनची सदस्य कु. श्रुती राकेश पांडे हिने रेडिसन हॉटेल अंधेरी, मुंबई मध्ये झालेल्या चीन, तैवान, जपान, कोरिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, पनामा, इराण, इंडोनेशिया, तामिळनाडू, राजस्थान,या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय देशातील विद्यार्थ्यांसोबत झालेल्या अबॅकस ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेत वय वर्ष १२ असणारी श्रुती पांडे हिने दुसरा क्रमांक पटकावला. ही परीक्षा ४ वर्षापासून ते १४ वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये वयानुसार ग्रूप मध्ये घेतली जाते, या मध्ये ३ मिनिटचे ३ आणि १ मिनिटचे ३ टायमर लावून गणिते सोडवले जातात.  स्वा सावरकर नगर वंडर किड्स अकॅडेमी अबॅकस सेंटरची ही  विद्यार्थीनी आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात तिला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले या यशामुळे गुणवंत विद्यार्थिनी श्रुती पांडे हिचे सर्व क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत