अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळवा विभाग कार्यालयाचे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्याहस्ते उद्घाटन
प्रतिनिधी ౹ ठाणे-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळवा विभाग कार्यालयाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्याहस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले. तसेच कळवा विभागासाठी नजीब मुल्ला यांच्या वडीलांच्या (हाजी सुलेमान मुल्ला) स्मृती प्रित्यर्थ रुग्णवाहीका लोकार्पण व कळवा-मुंब्रा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना तीन लाख वह्यांचे वाटप सुरु करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) च्या कळवा विभाग कार्यालयाचे आशर आर्या को ऑ. हौ. सोसायटी खारीगांव तलाव समोर, कळवा, ठाणे येथे, प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष श्री. आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्यांक विभागाचे निरीक्षक श्री. नजीब मुल्ला यांच्याहस्ते सोमवारी, २२ जुलै २०२४ रोजी उद्घाटन पार पडले. यावेळी नजीब मुल्ला यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कळवा विभागासाठी रुग्णवाहीका देखिल उपलब्ध करुन दिली. तसेच कळवा-मुंब्रा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना तीन लाख वह्या वाटपाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी मा. नगरसेवक श्री. प्रकाश बर्डे, श्री. राजेंद्र साप्ते, श्रीमती. मंगलताई कळंबे, सौ. अनिता गौरी, श्री. गणेश कांबळे, श्री. उमेश पाटील, मा. परिवहन समिती सदस्य श्री. तकी चेऊलकर, श्री. शाम पाटील, शिवसेना शहर प्रमुख श्री. नरेश शिंदे, परिवहन समिती सदस्य श्री. नितीन पाटील, श्री. मोहसीन शेख, सरचिटणीस श्री. प्रभाकर सावंत, श्री. रविंद्र पालव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. सुनिल पाटील, श्री. विशाल गांगुर्डे, महिला अध्यक्षा सौ. वनिताताई गोतपागर, युवक अध्यक्ष श्री. विरु वाघमारे, युवक कार्याध्यक्ष श्री. संदेश पाटील, विद्यार्थी अध्यक्ष कु. कौस्तुभ गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष श्री. मंगेश सुर्यवंशी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष श्री. हुसेन मणियार, हिंदी भाषी सेल अध्यक्ष श्री. राजनाथ यादव, वैद्यकीय सेल चे कार्याध्यक्ष श्री. रोहन जाधव, युवकचे प्रदेश पदाधिकारी श्री. परवेज शेख, श्री. आदित्य धुमाळ, कळवा महिला ब्लॉक अध्यक्षा सौ. पल्लवी गिध, युवक पदाधिकारी श्री. मयुर आरोटे, श्री. शेहबाज चेऊलकर, श्री. दिनेश बने, श्री. समीर आडकर, श्री. मंगेश तांबे, युवती पदाधिकारी झारा शेख तसेच कळव्यातील महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment