प्रख्यात लेखक पत्रकार मनीष वाघ यांच्या "विश्लेषण" या लेखन संग्रहाचे प्रकाशन ..हे पुस्तक म्हणजे जणू "बौद्धिक पोस्ट मार्टम "इति समाजसेवक डॉ.राजेश मढवी

 


मुहूर्त गुरुपौर्णिमेचा आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार स्व.चंद्रशेखर वाघ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून लेखक पत्रकार मनीष वाघ' यांच्या "विश्लेषण" नामक लेखन संग्रहाचे प्रकाशन समाजसेवक डॉ. राजेश मढवी यांच्या शुभहस्ते झाले. "विश्लेषण" लेखन संग्रह म्हणजे जणू  "बौद्धिक पोस्ट मार्टम" असे डॉक्टरांनी वर्णन केले.कविता,पर्यावरण,समाजकारण,राजकारण अशा विविध विषयात वाघ यांनी बरीचशी पुस्तके लिहलेली आहेत.स्तंभ लेखन करताना समाजात घडणाऱ्या घटना,दुर्घटना शासन, प्रशासन यांचे निर्णय यावर वाघ हे परखड लेखन करतात आणि समाज मानसात प्रबोधन, जागृती करतात. सदर कार्यक्रमास साहित्यिक अँड. मनोज वैद्य(को.म. सा.प),निशिकांत महाकाळ, विनोद पितळे, मनोहर बापट, दामले,मिश्रा असे विभूती उपस्थित होते. सदर लेखन संग्रहाचे प्रकाशन सिद्धी फ्रेंड्स पब्लिकेशन या प्रकाशकाने केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत