1 ते 15 जुलै दरम्यान झालेल्या सिंगल यूज प्लॅस्टिक बंदी कारवाईत* *एकूण 803 किलो प्लॅस्टिक जप्त
ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील विविध प्रभागसमित्यांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून सिंगल यूज प्लॅस्टिकबंदी मोहिम तीव्र स्वरुपात राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभाग, प्रदुषण नियंत्रण विभाग, प्रभागसमितीमधील अतिक्रमण व निष्कासन विभागामार्फत सदरची कारवाई सुरू आहे. दिनांक 1 ते 15 जुलै 2024 या कालावधीत करण्यात आलेल्या सिंगल यूज प्लॅस्टिक बंदी मोहिमेत ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण 1393 आस्थापनांना भेटी देण्यात आल्या असून या अंतर्गत एकूण 803.26 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून त्यापोटी एकूण 4 लाख 1 हजार 400 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळावा यासाठी सिंगल यूज प्लॅस्टिक बंदी कारवाई तीव्र स्वरुपात राबविण्यात येत असून विक्रेत्यांकडे असलेला प्लॅस्टिकचा साठा जप्त करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सदरची कारवाई ही महापालिका कार्यक्षेत्रात नियमित सुरू राहणार असून नागरिकांनी देखील सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर करु नये असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभाग, प्रदुषण नियंत्रण विभाग, प्रभागसमितीमधील अतिक्रमण व निष्कासन विभागामार्फत सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी विविध प्रभागसमित्यांमध्ये करण्यात आलेल्या सिंगल यूज कारवाईत 288 आस्थापनांना भेटी देवून एकूण 251 किलो प्लॉस्टिक जप्त करुन त्यापोटी रु. 81 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली.
*मंगळवारी करण्यात आलेल्या कारवाईत 251 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त*
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिवा प्रभाग समितीअंतर्गत 52 आस्थापनांना भेटी देवून 13 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 10 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. मुंब्रा प्रभागसमितीअंतर्गत एकूण 45 आस्थापनांना भेटी देवून 56 किलो प्लास्टिक जप्त करुन एकूण 18 हजार 500 रु. इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
कळवा प्रभाग समितीअंतर्गत 35 आस्थापनांना भेटी देवून 9 किलो प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 8 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. उथळसर प्रभाग समिती अंतर्गत एकूण 40 आस्थापनांना भेटी देवून 14.5 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 9 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वागळे इस्टेट प्रभाग समिती अंतर्गत एकूण 56 आस्थापनांना भेटी देवून 7.5 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 6 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत एकूण 20 आस्थापनांना भेटी देवून 4 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 5 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. माजिवडा मानपाडा प्रभागसमिती अंतर्गत एकूण 40 आस्थापनांना भेटी देवून एकूण 147 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 24 हजारांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली असून सदरची कारवाई नियमित सुरू राहणार असल्याचे पर्यावरण विभागाच्या उपायुक्त अनघा कदम यांनी नमूद केले आहे.
Post a Comment