पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

 



             ठाणे : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून या काळात पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने दक्षतेचा उपाय म्हणून पिण्याचे पाणी गाळून आणि उकळून प्यावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

              नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टाक्या आतून स्वच्छ करून घ्याव्यात. पाण्याच्या टाकी सभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी. या उपायांमुळे जलजन्य रोगांचा प्रसार टाळता येईल. त्यामुळे नागरिकांनी ही दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत