अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघ आणि नाथपंथी समाजाचा खासदार डॉ.
मतदारसंघातील विकासकामांची घोडदौड पाहून पाठींबा जाहीर
ठाणे : महाराष्ट्रातील अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघ आणि नाथपंथी समाजाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. विकासकामांची घोडदौड लक्षात घेऊन या दोन्ही समाजाकडून समर्थन जाहीर करण्यात आले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे पार पडली आहेत, तर अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. वाहतूक व्यवस्था वेगवान करण्यासाठी रस्त्यांचे काँक्रीटीकरण, रुंदीकरण, नव्याने पुलांची उभारणी, महामार्गांची उभारणी तसेच मतदारसंघातील विविध समाजातील बांधवांसाठी समाज मंदिरांची उभारणी यांसारखी अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. याच पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांबरोबरच विविध सामाजिक आणि समाज संघटनांकडून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघ आणि नाथपंथी समाजाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. विकासकामांची घोडदौड लक्षात घेऊन या दोन्ही समाजाकडून समर्थन जाहीर करण्यात आले आहे. तसेच खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ येत्या २७ एप्रिल रोजी उल्हासनगर येथे जाहीर सभा घेतली जाणार असल्याची माहिती संस्थेचे प्रदेशाध्यक्ष मोहन कंडारे यांनी दिली आहे. तर यासोबतच नाथ संप्रदाय आणि नाथपंथी समाजाकडूनही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी सर्व साधू संतांचे आशिर्वाद असल्याचे पाठींबा पत्र श्री नानानंद महाराज यांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिले आहे. दरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघ आणि नाथपंथी संप्रदायाचे आभार मानले आहेत.
a.png)
Post a Comment