सिद्धेश्वर तलाव येथे श्री समर्थ मित्र मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर व अमृतमुल्य किर्तन सोहळा संपन्न







ठाणे ः ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरात कार्यरत असलेल्या श्री समर्थ मित्र मंडळ या सेवाभावी संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायण महापुजेनिमित्त रक्तदान शिबीर व अमृतमुल्य किर्तन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रक्तदान शिबिरात सुमारे 232 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर यावेळी आयोजित आरोग्य शिबिरातही ईसीजी, मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष निलेश मुंढे, सरचिटणीस गणेश हळदे, खजिनदार नारायण काते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यास भाजिवाली चाळ, पाटीलवाडी रोड, सिद्धेश्वर तलाव परिसरातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी अजितभाई शहा, संतोष अबगुल, नारायण पवार, रुचिता मोरे, प्रल्हाद पाटील सचिनदादा भोसले आदींची विशेष उपस्थिती लाभली.



रविवारी सिद्धेश्वर तलाव परिसरात श्री समर्थ मित्र मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी संतोष अबगुल प्रतिष्ठान व श्रीमती शारदाबाई हौशिलाल मेडीकल फाउंडेशन ट्रस्ट व वेद हॉस्पिटल यांच्यावतीने रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर संपन्न झाले. यावेळी 232 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर हजारो नागरिकांनी आरोग्य तपासणीत सहभाग घेतला. सायंकाळी 7 वाजता हरिपाठ व रात्रौ अमृतमुल्य किर्तन सोहळयामध्ये खेड तालुक्यातील कळंबणी गावचे ह.भ.प. गणेश महाराज शिगवण यांच्या सुमधूर किर्तनाचा आस्वाद भाविकांनी घेतला. या कार्यक्रमासाठी सल्लागार सुनिल चव्हाण, अनंत शिंदे, सुरेश तटकरे, यशवंत जवरत, संजय गायकवाड, एकनाथ तेली, रिंकेश जाधव, चंद्रकांत कासार, गजानन साळसकर, विशाल फाटे, अंकुश हिरवाडकर, नितीन खामकर, नरेंद्र महाबळे, महेंद्र ठाकूर, दिनेश हळदे, संतोष दंत, हर्षद उतेकर, सुभाष बारस्कर,  स्वप्नील कालेकर, अमित दिगे, मधुकर साळुंखे, सुरेश ऐत, निळकंठ काते, भावेश चव्हाण, संदेश जवरत, केवळ चव्हाण, प्रशांत खरीवले, साहिल गायकवाड, मंगेश मुंडे, सौरभ शिंदे, रोहित हळदे, संस्कार तटकरे, सर्वेश गायकवाड, रविंद्र घाडगे, रुपेश पवार, विष्णु पांचाळ, महेश मोरे, मयुर कदम, सुचित चव्हाण, आत्माराम गंगुत्रे, कल्पेश चव्हाण, रोहिदास लोखरे, नामदेव निपुत्रे, बापु पाटील, अशु ठाकूर आदी कार्यकर्ते व हितचिंतकांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत