आ. केळकर यांचा दणका आणि त्या कुटुंबाला २५ लाखाचा चेक मिळाला.

 



घरची गरिबी, वडील हयात नाहीत. आई गृहिणी...घरात कमवता कोणीच नाही. मनीष कदम हा ठाण्यात राहणारा तरुण... शिकण्याचं वय असताना गरज म्हणून डॉमिनोज पिझ्झा कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला लागला. पण कंपनीचे नियुक्ती पत्र नाही की कोणतीही हमी नाही... तरीही तो घरासाठी काम करत होता...


मनीषला एकदा कंपनीत दुसरं काम दिलं गेलं, ते काम करताना मशीनच्या बिघाडामुळे अपघाती मृत्यू झाला. नोकरीला ६ महिनेच झालेले, घरावर  अक्षरशः आभाळ कोसळलं. नुकसान भरपाई मिळावी म्हणून नातेवाईकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला...पण दाद मिळाली नाही.... म्हणून नातेवाईकांनी ठाण्याचे आमदार श्री. संजय केळकर यांच्याकडे संपर्क केला. त्यांनी संबंधित सर्व शासकीय व कंपनीच्या यंत्रणांशी संपर्क, संवाद साधून डॉमिनोज कंपनीला भरपाई देण्यास भाग पाडलं. गेलेल्या माणसाची कशानेच पोकळी भरु शकत नाही. पण कुटूंबाची उपासमार थांबावी म्हणून केलेली धडपड कामी आली. परिवाराला धीर देणं आवश्यक होतंच पण न्याय देणं सुद्धा महत्वाचं होतं. कुटुंबाला कंपनीने रू. २५ लाखाचा चेक अदा केला व कुटुंबातील एकाला नोकरी देण्याबाबत सुद्धा हमी दिली. याबाबत मनीषच्या परिवाराने साश्रू नयनांनी आ. केळकर यांचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत