ठाण्यात` जाणता राजा'चे प्रयोग
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील थरारक व शौर्याचे दर्शन घडविणारे महानाट्य म्हणजे `जाणता राजा'. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्ताने राज्य सरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास `जाणता राजा'च्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचविला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे भव्य नाट्य रुपांतर पाहून नव्या पिढीला प्रेरणा मिळत आहे.
मुख्यमंत्री श्री. एकनाथ जी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र जी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून `जाणता राजा'चे प्रयोग होत आहेत. आतापर्यंत `जाणता राजा'चे ११०० प्रयोग झाले असून, राज्य सरकारच्या माध्यमातून ५३ व ५४ वा प्रयोग ठाण्यात होईल. ठाण्यातील ढोकाळी येथील हायलॅण्ड पार्कच्या प्रशस्त मैदानावर शुक्रवार २२ मार्च, शनिवार २३ मार्च आणि रविवारी २४ मार्च रोजी सायंकाळी प्रयोग होतील. त्यासाठी सर्व नागरिकांना मोफत प्रवेश आहे.
Post a Comment