13 हजार 538 ग्रामीण कुटुंबांना मिळाले स्वप्नांचे घर
जि.प. मार्फत केंद्र पुरस्कृत योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची यशस्वी अंमलबजावणी
पंतप्रधान आवास, रमाई, शबरी, आदिम, मोदी घरकुल योजनाच्या माध्यमातून आदिवासी, अनुसूचित जाती जमातीतील गोरगरीब, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आर्थिक, दुर्बल घटकांना पक्क्या घरासाठी अर्थसहाय्य दिले जाते. ठाणे ग्रामीण भागातील 13 हजार 538 गोरगरीब कुटुंबियाना त्यांच्या स्वप्नाचे घर मिळाले. केंद्र पुरस्कृत योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची यशस्वी अंमलबजावणी होत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली.
केंद्र पुरस्कृत घरकुल योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत 2016-17 ते 2021-22 यावर्षात 9 हजार 535 घरकुल ठाणे जिल्ह्यात मंजूर झाली असून 8 हजार 946 घरकुल पूर्ण करण्यात यश मिळाले असून 93 टक्के काम पूर्ण झाले आहे. शिल्लक 589 घरकुल लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मार्फत करण्यात आले आहे.
सन 2016-17 ते 2021-22 या वर्षात केंद्र पुरस्कृत योजना पंतप्रधान आवास व सन 2016-17 ते 2022-23 या वर्षात राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, आदिम, मोदी घरकुल योजनाच्या माध्यमातून 13 हजार 538 घरकुल पूर्ण करण्यासाठी यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे.
Post a Comment