‘महावितरण’ला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार नवीकरणीय ऊर्जेसाठीही दोन राष्ट्रीय पुरस्कारांचा मान

   


 


मुंबई :जागतिक दर्जाची तत्पर  डिजिटल ग्राहक सेवा तसेच दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी वितरण यंत्रणेतील आमुलाग्र सुधारणांची दखल घेत इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आयपीपीएआयमहावितरण कंपनीला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविले आहेतसेच नवीन  नवीकरणीय ऊर्जेसाठी केलेल्या कामगिरीबद्दल प्रथम तर ग्राहकाभिमुख जनजागृतीबद्दल द्वितीय क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने महावितरणला गौरविण्यात आलेयासह वीज मिटरिंगसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल देखील महावितरणला विशेष पुरस्कार देण्यात आला.



आयपीपीएआयच्या वतीने बेळगाव (कर्नाटकयेथे आयोजित कार्यक्रमात पॉवर अवार्ड २०२४ चे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आलेकेंद्रीय विद्युत प्राधीकरणाचे अध्यक्ष श्रीघनश्याम प्रसादकेंद्रीय नवीन  नवीकरणीय ऊर्जा विभागाचे सचिव श्रीभूपिंदरसिंग भल्लाकेंद्रीय विद्युत प्राधीकरणाचे माजी अध्यक्ष डॉप्रमोद देव यांच्याहस्ते महावितरणचे मुख्य अभियंता (देयके  महसूलश्रीसंजय पाटील आणि वीज दर नियामक कक्षाचे अधीक्षक अभियंता श्रीमिलिंद दिग्रसकर यांनी हे पुरस्कार स्वीकारलेया पुरस्कारांबद्दल महावितरणचे अध्यक्ष  व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्व अभियंतेअधिकारी  कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.



वीज वितरण कंपनी म्हणून देशात नावलौकीक असलेल्या महावितरणने वीज क्षेत्रात पायाभूत आराखडा विकासवीजबिलांच्या प्रक्रियेतील सुधारणा आणि जागतिक दर्जाची तत्पर ग्राहकसेवांना प्राधान्य देत आमुलाग्र सुधारणा सुरु केल्या आहेततसेच राज्याचे उपमुख्यमंत्री  ऊर्जा मंत्री मानाश्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे स्वप्न मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना. नुसार साकारले जात आहेइतर राज्यांनी देखील या क्रांतीकारी योजनेच्या अंमलबजावणीचा अभ्यास सुरु केला आहे.




छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात महावितरणने देशात मोठी आघाडी घेतली आहेअपारंपरिक ऊर्जा वापरामध्ये देण्यात येणारे प्राधान्य  लक्षणीय कामगिरी तसेच केंद्र शासनाच्या नवीन  नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महावितरणला १९ जानेवारी २०२२ रोजी रूफ टॉप सोलार प्रोग्रॅम फेज - अंतर्गत १९ जानेवारी २०२४ पर्यंत दोन वर्षांमध्ये घरगुती ग्राहकांसाठी १०० मेगावॅटचे उद्दिष्ट दिले होतेमहावितरणने हे उद्दिष्ट दि२५ सप्टेबर २०२३ रोजी म्हणजे चार महिने आधीच पूर्ण केले आहे.

महावितरणने वीज वितरण कंपनी म्हणून सुरू केलेल्या पायाभूत आराखडा विकासाच्या व ग्राहकसेवांच्या आमुलाग्र सुधारणानवीन  नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात केलेली कामगिरी याची दखल घेऊन आयपीपीएआयच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर चार पुरस्कार प्रदान करून महावितरणला गौरविण्यात आले आहे.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत