कविवर्य अरुण म्हात्रे यांच्या समवेत साहित्यरंगी रंगून नवी मुंबई महानगरपालिकेत मराठी भाषा गौरव दिन साजरा



 

मराठी भाषा ही अत्यंत ऐश्वर्यसंपन्न असून मराठी भाषेत निर्माण झालेले साहित्य अविट गोडीचे असल्याचे सांगत सुप्रसिद्ध साहित्यिककवी श्री‌. अरुण म्हात्रे यांनी हा गोडवा आपण सतत अनुभवत राहिला पाहिजे व आपले मराठीपण अभिमानाने जपले पाहिजे आणि त्यासाठी मराठीतूनच व्यक्त होत राहिले पाहिजे असे सांगितले.

      

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील अॅम्फीथिएटरमध्ये संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमात कविवर्य श्री. अरुण म्हात्रे यांनी 'साहित्य - रंग जीवनाचेया विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी नमुंमपा आयुक्त श्री राजेश नार्वेकरअतिरिक्त आयुक्त श्री विजयकुमार म्हसाळ आणि इतर अधिकारीकर्मचारी व रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      

सध्या 'येरे येरे पावसाचे दिवस सरले असून‌ 'रेन रेन गो अवेइतका मोठा बदल झाला आहे. त्यामुळे आजीचे माध्यम वेगळे आणि नातीचे मिडीयम वेगळे अशा मराठीची चिंता वाटू लागण्याच्या दोलायमान काळात आपल्या घरात नातवंडांशीलहान मुलांशी ठासून मराठीतच बोलले पाहिजे असे अरुण म्हात्रे यांनी सांगितले. आजचा दिवस केवळ हे व्याख्यान ऐकून मनोरंजन करण्याच्या पलीकडे जात मराठी भाषेविषयी एक तरी गोष्ट प्रत्येकाने करावी असेही आवाहन त्यांनी केले.

      

कविवर्य मंगेश पाडगावकरविंदा करंदीकरविठ्ठल वाघनाधों महानोरमहेश केळुसकरअशोक नायगावकर अशा कवींच्या कविता सादरीकरणाची वैशिष्ट्यपूर्ण शैली अविष्कृत करत अरुण म्हात्रे यांनी विविध कवितांची बरसात केली ज्यामध्ये रसिक न्हाऊन निघाले.

      

आपण संपन्न मराठी भाषेत बोलतो याचा सार्थ अभिमान आपण बाळगला पाहिजे असे सांगत कवी अरुण म्हात्रे यांनी कविता जीवनाचा सर्वांगीण अनुभव देतेजगायला शिकवते त्यामुळे आपण वाचत राहिले पाहिजे असा संदेश दिला.

      

महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन शासनाच्या 2013 मधील शासन निर्णयानुसार मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो अशी माहिती देत नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच मराठी भाषा आणि साहित्याला प्राधान्य देणारे नानाविध उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जीवनस्पर्शी साहित्याबद्दल भाष्य करीत व त्यांना अभिवादन करीत वाचन‌ संस्कृतीच्या विकासासाठी महानगरपालिकेमार्फत केल्या जात असलेल्या अभिनव ग्रंथालय उभारणीच्या उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.

      

नवी मुंबई महानगरपालिकेने अगदी स्वच्छ सर्वेक्षणातही साहित्याला प्राधान्य दिल्याचे सांगत स्वच्छ कवी संमेलन असो की महानगरपालिका क्षेत्रात उभारलेल्या चित्रकविताभिंती असोतया राष्ट्रीय पातळीवर नोंद घेतलेल्या उपक्रमांमध्ये कवी अरुण म्हात्रे यांनी दिलेल्या योगदानाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.

      मराठी भाषा संवर्धनासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबद्ध असून यापुढील काळात राजभाषा मराठीला गौरव प्राप्त करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका अधिकाधिक उत्तम उपक्रम राबवेल असे त्यांनी सांगितले.

      रंगावलीकार श्रीहरी पवळे यांनी कविवर्य कुसुमाग्रजांच्या रेखाटनासह चितारलेली रांगोळी मराठी भाषा गौरव दिनाचे आकर्षण होते. अनेकांनी या रांगोळी सोबत छायाचित्रसेल्फी काढून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत