परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमात 35 वा ' रस्ता सुरक्षा अभियान ' कार्यक्रम दि.14/02/2024 रोजी सकाळी 10.00 ते 13.00 या वेळेत प्रशिक्षण हॉल, घणसोली आगार, नवी मुंबई येथे मा. श्री.योगेश कडुसकर, परिवहन व्यवस्थापक, नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन श्री. तिरुपती काकडे, पोलिस उपआयुक्त(वाहतूक) नवी मुंबई, श्रीम.हेमांगिनी पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई, तसेच श्री.संजय बोंडे (वाहतूक निरीक्षक, श्री.विश्वास भिंगारदिवे- सहाय्यक पोलिस निरक्षक., श्री.विनय मोरे,सारथी सुरक्षा सेवा, श्री.अमोल मिसाळ, सलाम फाऊंडेशन- व्यसनमुक्ती, मे. महालक्ष्मी मोटर ट्रान्सपोर्ट प्रा. लि. श्री. राम मोहन रेड्डी, जे.बी.एम. जनरल मॅनेजर तसेच परिवहन उपक्रमातील अधिकारी श्री. विवेक अचलकर- कार्यकारी अभियंता, श्री.उमाकांत जंगले, मुख्य वाहतूक अधिकारी, श्री. सुनिल साळुंखे वाहतूक अधिक्षक, श्री. निवृत्ती सिताप-अगार व्यवस्थापक श्री. जीवन माने- कनिष्ठ अभियंता, तसेच श्री. राजेश जगताप-अभियंता, इ. मान्यवर उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत नमुंमपा परिवहन उपक्रमातील सर्व वाहन चालकांकरिता प्रशिक्षण आयोजित केले होते. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात मान्यवरांमार्फत खाली विषयांवर चालक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले.
श्री.तिरुपती काकडे, पोलिस उपआयुक्त(वाहतूक)
1) अपघातामुळे कुटुंबावर होणारा परिणाम
2) वाहतूकीचे नियम
3) बस ताब्यात घेतांना घ्यावयाची काळजी
4) मिरर पोझिशन, ब्लांईंड स्पॉट कव्हर विषयी.
5) शिटींग पोझिशन, पावसाळ्यात घ्यावयाची काळजी
6) अपघात होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी. तसेच
श्रीम. हेमांगिनी पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
1) बस चालवतांना घ्यावयाची काळजी
2) कामातच पुण्य कसे कमवु शकतो
3) वाहन चालकामध्ये कोणकोणते गुण असणे गरजेचे आहेत.
4) अपघात कसे टाळता येतील.

Post a Comment