ठाण्यात होणार 'नमो महारोजगार' मेळावा

 

 

24 व 25 फेब्रुवारी रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन

मेळाव्याच्या पूर्व तयारीचा ठाणे महापालिकेने घेतला आढावा

 

 




ठाणे : कौशल्यरोजगार,उद्योजकता  नाविन्यता विभागांमार्फत बेरोजगार युवक तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी हायलॅण्ड ग्राऊंडढोकाळीमाजीवाडाठाणे (पश्चिमयेथे कोकण विभागांतर्गत ठाणेपालघररायगडसिंधुदुर्गमुंबई उपनगरमुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक  युवतींकरिता  ‘नमो महारोजगार मेळाव्याचेआयोजन करण्यात आले आहेहा मेळावा २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४  रोजी सकाळी १० ते सायंकाळी  या वेळेत होणार आहे.  महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली या नमो महारोजगार मेळाव्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सर्व तयारी केली जात असून विविध विभागांमार्फत करण्यात येत असलेल्या विविध कामांचा आढावा आज अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी घेतला.

 

            या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी आज (07 फेब्रुवारी) महापालिकेतील विविध विभागांच्या विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मेळाव्याच्या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता करणे, धूर व औषधफवारणी करणे, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था तसेच मेळाव्यासाठी उपस्थित राहणाऱ्यांसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था, बसेस उपलब्ध करणे, विद्युत व्यवस्था, अग्निशामक सुविधा तसेच वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देणेबाबतच्या सूचना अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, वर्षा दिक्षीत आदी उपस्थित होते.

 

या नमो महारोजगार मेळाव्याकरिता जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याकरिता कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच ठाणे शहरातील विविध खाजगी आस्थापना, रुग्णालये, पॅथॉलॉजी सेंटर, मॉल्स आदी ठिकाणी पत्रव्यवहार करुन त्यांना आवश्यक असलेले कुशल- अकुशल कामगारांची यादी मागविण्यात यावी अशाही सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

 

या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स, इनव्हेस्टर्स व इनकुबेटर्स सहभागी होणार आहेत.  दहावी, बारावी,आय.टी.आय., पदविका,पदवीधर,पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेत रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd  किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या लिंक वरती जाऊन उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एका पेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करुन मुलाखत देता येतील. रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील, त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून  दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.


कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत