धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचा सच्चा शिष्य म्हणजे नरेश मणेरा - प्रसिद्ध अभिनेते अभिजीत खांडकेकर
प्रतिनिधी ౹ ठाणे-धर्मवीर चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचा सच्चा शिष्य नरेश मणेरा यांची भेट झाली आणि त्यांच्याचमुळे महाराष्ट्र महोत्सवात आलो असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते,दिग्दर्शक अभिजीत खांडकेकर यांनी काढले.
'तुझेच मी गीत गात आहे' या स्टारप्रवाहावरील लोकप्रिय मालिकेतील जोडी मोनिका आणि मल्हार म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि प्रसिद्ध अभिनेते अभिजीत खांडकेकर यांनी, शिवसेनेचे ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख व वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी उपमहापौर नरेश मणेरा आयोजित महाराष्ट्र महोत्सवाला भेट दिली यावेळी ते बोलत होते.
नरेश मणेरा यांचे नाव ऐकून होतो. आपल्या प्रभागात नरेश मणेरा यांनी केलेल्या विकासकामांमुळे लोकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होती. पण धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर या चित्रपटाची घोषणा झाली आणि दिघे साहेबांना जाणून घेण्यासाठी नरेश मणेरा यांच्यासोबत झालेल्या भेटीगाठीतील चर्चेत अनेक नवीन माहिती मिळाली. यानिमित्ताने धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचे सच्चे शिष्य नरेश मणेरा यांची अनेकदा भेट झाली.या दरम्यान झालेल्या चर्चेतून नरेश मणेरा यांचाही जीवनपट उलगडत गेला. त्यांच्याच प्रभागातील आधुनिक, विस्तीर्ण रस्त्यांवर व विभागात अनेकदा मालिकांच्या शुटींगच्या निमित्ताने येण्याचा प्रसंग येत असतो, यामुळे भेट होत राहते. यातुन आमच्यातील नाते घट्ट झाले आहे. यामुळेच नरेश मणेरा सलग १२ वर्ष अयोजित करत असलेल्या महाराष्ट्र महोत्सवात मी आलो आहे.आता यातील हेरुन ठेवलेल्या काही स्टाॅलला भेट देणार आहे, नरेश मणेरा यांच्या सांस्कृतिक कामाना माझ्या मनापासून सदिच्छा आहेत, असे कौतुकाद्गार अभिनेते अभिजीत खांडकेकर यांनी काढले. तर अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांनी म्हटले की, नरेश मणेरा यांच्या महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्ताने लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्यात आता पुन्हा ते क्षण अनुभवण्यासाठी महोत्सवातील स्टाॅलचे दर्शन घेणार आहे.
यावेळी महाराष्ट्र महोत्सवात अभिनेते अभिजीत खांडकेकर व अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचा नरेश मणेरा यांच्या उपस्थितीत हृदयगंम सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाल्मली सुखटणकर, निरुपमा डे, नचिकेत देसाई या कलाकारांनी, स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या गीतांवर आधारित 'स्वर आशा' हा सदाबहार मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करुन महाराष्ट्र महोत्सवातील रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
.jpeg)
Post a Comment