श्री माँ विद्यालयात 20 व्या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

 

श्री माँ विद्यालयात 20 व्या 

आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन




ठाणे : श्री माँ विद्यालय, पातलीपाडा, ठाणे (प.) यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या 20 व्या आंतरशालेय प्रदर्शनाचे उद्घाटन श्री माँ ट्रस्टचे विश्वस्त, श्री माँ ग्रुफ ऑफ इन्स्टिट्यूशनचे डायरेक्टर व चेअरमन यांच्या हस्ते दिपप्रज्वलीत करून झाले. तसेच वार्षिक विज्ञान प्रकल्प स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी 3 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वा. प्रमुख पाहुणे पराग भार्गवा, प्राध्यापक, आय.आय.टी. मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी प्रविण नागरे, सेक्रेटरी रमेश जोशी, विश्वस्त व प्रिन्सीपॉल मिस. मंजू तेजवानी, सीता रविंद्रन - डायरेक्टर डल्लास आश्रम, डायरेक्टर चित्रा अय्यर, प्रिन्सीपॉल मिनी नायर, वाईस प्रिन्सीपॉल मेघना वांगे तसेच मुख्याध्यापिका रमा अनंतरामन उपस्थित होते. विज्ञान प्रकल्पासाठी विविध बुध्दीगम्य विषय देण्यात आले आहेत.


विज्ञान प्रदर्शनासाठी ठाणे जिह्यातील 18 शाळांचा समावेश आहे. आंतरशालेय 30 प्रकल्प तसेच वार्षिक 400 प्रकल्प आयोजित केले होते. पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी - चांगल्या वातावरणासाठी शाश्वत शहरी नियोजनाचे धोरण, दैनंदिन जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर तसेच आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी - आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद प्रणाली, आधुनिक शेती तंत्रज्ञान हे विषय देण्यात आले आहेत.
श्री माँ स्नेहदिप ट्रस्ट संचालित श्री माँ स्नेहदिप स्कूलच्या विशेष विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग दिला असून त्यांनी विविध विषयांवरील शैक्षणिक साधनांवर तयार केलेल्या प्रकल्पांची मांडणी केली आहे, अशी माहिती श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या को-ऑर्डीनेटर मंजू तेजवानी यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत