ठाणे महापालिकेत हुतात्म्यांना आदरांजली
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन पाळला जातो. संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येते. ठाणे महापालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आज दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, अनघा कदम, सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे व महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment