रेझींग डे निमित्त आयोजित सायकल रॅलीत अबालवृृद्ध सहभागी
पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीही चालवली सायकल
ठाणे : रविवारी ठाणे शहर पोलीस अंतर्गत नौपाडा पोलीस स्टेशन आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीमध्ये सहा वर्षाच्या चिमुकल्यापासून ७० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली येथील तब्बल १०७ हून अधिक सायकलप्रेमींनी सहभाग घेतला होता. इतकेच नव्हे तर या रॅलीत पोलीस उपायुक्त परिमंडळ १ गणेश गावडे, नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर यांच्यासह इतर पोलीस बांधवांनी देखील सायकल चालविली. त्यामुळे इतर सायकलप्रेमींचा आनंद द्विगुणीत झाला होता.
रविवारी सकाळी ७.३० वा. चिंतामणी चौक येथून सायकल रॅलीला सुरुवात झाली. दगडी शाळा येथून उपवनमार्गे जाऊन पुन्हा चिंतामणी चौक येथे समाप्त झाली. उपायुक्त गावडे यांनी रेझींग डे निमित्त सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देत सर्व सायकलप्रेमींचे कौतुक केले. ही सायकल रॅली आयोजित करण्यात आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनचा सिंहाचा वाटा आहे. तसेच, कोणत्याही अडचणीत ११२ या क्रमांकावर पोलीसांना संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले. आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनचे सर्व सदस्य या सायकल रॅलीत पोलीस बांधव - भगिनींच्या कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी सहभागी झाले असल्याचे संस्थेच्या संस्थापिका - अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर युवा एनजीओ फाऊंडेशनचे स्वप्नील मराठे, सिमरन ग्रुपचे दीपक बेंडोकळी, मनिस कॅफेचे मुत्थु नायर, वरिष्ठ सायकलप्रेमी प्रा. नारायण बारसे, प्रा. सुनील भुसारा आदी उपस्थित होते. या सायकल राईडचे नेतृत्व भुसारा यांच्यासह गजानन दांगट, संकेत सोमणे, पंकज रिझवानी, लतिक गोलटकर, धनंजय तेलगोटे, अभिजीत राजे, मीनाक्षी आणि काशिनाथ गायकवाड यांनी केले. अजय नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment