आनंद विश्व गुरुकुल इंन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनचा परिचारिका शपथविधी सोहळा संपन्न
ठाणे- आनंद विश्व गुरुकुल इंन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनचा परिचारिका शपथविधी सोहळा दिनांक ४ जानेवारी रोजी संपन्न झाला.
या शपथविधी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. भारती देशपांडे मेट्रॉन ऑफ शिवाजी हॉस्पिटल कळवा, सौ. आशा भावसर - इन्चार्ज सिस्टर ऑफ टी. एम. सी हॉस्पिटल बाळकुम, सौ. संगीता बागवे असिस्टंट मेट्रॉन ऑफ शिवाजी हॉस्पिटल कळवा, डॉ. जे. बी. भोर, डॉ. समिधा गोरे, डॉ. शेखर सुराडकर हे सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते.
शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, सेक्रेटरी डॉ. प्रदीप ढवळ, जेष्ठ रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षाला लिखिते, कनिष्ठ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सीमा हर्डीकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ. वैदही कोळमकर, स्किल डेव्हलपमेंटच्या कोऑरडीनेटर सौ. मयूरा गुप्ते या सर्वांनी कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
नर्सिंगच्या प्राचार्या मयूरी पेंडसे यांनी विद्यार्थ्यांना शपथ देऊन परिचरिकेचा वारसा पुढे चालवण्यासाठी प्रोत्साहन दिले. शपथविधी घेऊन नव्या उमेदीने विद्यार्थ्यांनी परिचारिका या क्षेत्रात खऱ्या अर्थाने पदार्पण केले व रुग्णांची प्रामाणिकपणे आणि निष्टेने सेवा करण्याची शपथ घेतली.
सर्व प्रमुख पाहुण्यानी व संस्थेचे अध्यक्ष व सेक्रेटरी यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे कार्य केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुनीता सरगर यांनी उत्तम प्रकारे केले. तसेच कार्यक्रमाची सांगता ही प्राचार्या मयूरी पेंडसे यांनी उपस्थितांचे आभार मानून केली. अशा प्रकारे हा कार्यक्रम उत्साहाने व जल्लोषात पार पडला.

Post a Comment