flowers

नोकरदार महिलांसाठी जागरूकता अभियान शुभारंभ

 


ठाणे महापालिका आणि कॉज फाऊंडेशन यांचा उपक्रम

             ठाणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका आणि कॉज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी कायदेविषयक जागरूकता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, उपायुक्त वर्षा दीक्षित, आरोग्य अधिकारी आणि विशाखा समितीच्या डॉ. राणी शिंदे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, रेखा हिरे, अॅड. संध्या जाधव, अॅड. वैशाली रोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

             ‘सुरक्षित शहर’ होण्यासाठी सर्व नोकरदार महिला यांच्या सुरक्षेबाबत कॉज फाऊंडेशन कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक-शोषण झाल्यास अगर कौटुंबिक हिंसाचार झाल्यास ‘सुरक्षित महिला (आयसीसी)‘ योजनेंतर्गत, महिलांना मदक उपलब्ध करून देण्यासाठी या अभियानाची माहिती ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय, अशासकीय आस्थापनांपर्यंत पोहोचवणे हे या अभियानाचे प्रयोजन असल्याचे कॉज फाऊंडेशनच्या संचालिका कल्पना जितेश मोरे यांनी सांगितले. कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या मार्गदर्शन कार्यक्रमात पालिकेतील महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कॉज फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेश मोरे यांनी आभार प्रदर्शन केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत