खेलो इंडिया युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये ठाण्यातील खेळाडूंची सर्वोत्कृष्ट कामगिरी
ठाणे : चेन्नई येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये अश्वमेध वेटलिफ्टिंग फाउंडेशनच्या ग्रीष्मा थोरात हिने १६७किलो वजन उचलून ७६किलो वजनी गटात दुसरा क्रमांक पटकावला. चुरशीच्या लढतीमध्ये ग्रीष्माने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर एक किलो ने मात करून ही कामगिरी केली. ग्रीष्मा अश्वमेध वेटलिफ्टिंग फाउंडेशनच्या ट्रेनिंग सेंटरवर सुरू असलेल्या जिल्हा वेटलिफ्टिंग प्रशिक्षण केंद्रावर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या मधुरा सिंहासने व दत्तात्रय टोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. ठाण्याच्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत तीन रजत व एक कांस्यपदक मिळविले आहे. सौम्या दळवी ४९किलो कांस्य पदक,सार्थ जाधव १०२ किलो वजनगटात कास्य, अनुश लोखंडे ६१किलो रजत पदक आणि ग्रीष्मा थोरात ७६किलो रजत पदक. सानिध्य मोरे ८९किलो रजत पदक पटकावले आहे.यामुळे या पाचही खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे . या यशामुळे सर्व खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.वेटलिफ्टिंग असोसिएशन ठाणे, अश्र्वमेध वेटलिफ्टिंग फाउंडेशन ठाणे, आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे यांचे बहुमूल्य सहकार्य खेळाडूंना मिळत आहे.या सर्व खेळाडूंना जर सरकारचे पाठबळ मिळेल तर मुले अजून चांगले यश मिळवू शकतात असे काही पालकांनी यावेळी सांगितले.
Post a Comment