राष्ट्रीय अध्यक्ष संजय भैय्यासाहेब सोनवणे यांचे ठाणे शहरात आगमन
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संजय भैय्यासाहेब सोनवणे यांचे नुकतेच ठाणे शहरात आगमन झाले होते. त्यावेळी ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते दुर्गेश भाऊ उघडे, मनोज भाऊ कांबळे, मनोज संदीप भैया कांबळे यांनी स्वागत केले. तत्पूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. यावेळी संजीव भैया साहेब सोनवणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमवेत शासकीय विश्रामगृहात ठाणे शहरातील समस्यांबाबत चर्चा केली.

Post a Comment